अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यातच अल्पवयीन मुलींवर अत्याचार होण्याच्या घटनांची नोंद देखील वाढू लागली आहे. यामुळे महिलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे.
नुकतेच अशीच एक धक्कादायक तसेच संतापजनक घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. शिलाईचे कपडे आणण्यासाठी जात असलेल्या ११ वर्षीय दोन अल्पवयीन मुलींवर एका ५५ वर्षीय नराधमाने अत्याचार केला आहे. ही घटना भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात ३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली आहे.
या प्रकरणात पीडित अल्पवयीन मुलींच्या तक्रारीवरून लाखांदूर पोलिसांनी आरोपीविरोधात अत्याचासह अन्य विविध कलमान्वये व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. अटक केलेल्या नराधमाचे नाव मधुकर हरी रंगारी असे आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, या घटनेच्या दिवशी दुपारच्या सुमारास दोन्ही अल्पवयीन मुली शिलाईला दिलेले कपडे आणण्यासाठी जात होत्या. या वेळी आरोपी मधुकर रंगारी याने दोन्ही अल्पवयीन मुलींना स्वतःच्या घरी जबरदस्ती खेचून नेऊन दार बंद केले. त्याने दोन्ही मुलींवर अत्याचार केला.
मुलींच्या ओरडण्याचे आवाज येतात घराशेजारील लोकांनी खिडकीतून डोकावून पहिले असता मधुकर हा दोन्ही अल्पवयीन मुलींवर अत्याचार करत असल्याच्या स्थितीत आढळून आला.
या घटनेची माहिती पीडित मुलींच्या पालकांना समजताच त्यांनी तातडीने लाखांदूर पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात गुन्हा दखल केला. पोलिसांनी मधुकर रंगारीला अटक केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम