पोलिसांवर जमाव हल्लाप्रकरणी आणखी एकास अटक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- संगमनेर शहरातील तीनबत्ती चौकात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जमावाने गस्ती पथकावरील पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याची घटना घडली होती.

याप्रकरणी आतापर्यंत 14 आरोपींना अटक करण्यात आली होती. दरम्यान त्यांची जामीनावर सुटका झाली असून आज पहाटे पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याची रवानगी एका दिवसाच्या पोलीस कोठडीत केली आहे.

त्यामुळे तीनबत्ती प्रकरणात निष्पन्न होऊन अटक झालेल्या आरोपींची संख्या आता पंधरा झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी संगमनेर शहरातील मोगलपूरा भागात मोठी गर्दी जमल्याने अहमदनगरहून बंदोबस्तासाठी आलेल्या आणि गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाने गर्दीला हटकले.

त्याचा राग येवून जमावाने पोलिसांसह त्यांच्या वाहनावर तुफान दगडफेक केली. या घटनेनंतर संपूर्ण तालुक्यात संताप निर्माण होवून राज्यभर त्याचे पडसाद उमटले. घटनेच्या दिवशी रात्री पोलिसांनी वरील परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेवून आरोपींची ओळख पटविण्यास सुरुवात केली.

गेल्या आठ दिवसात आरोपींच्या अटकेसाठी त्यांनी वारंवार छापासत्र राबवून आत्तापर्यंत 15 आरोपींना गजाआडही केले. या प्रकरणात अजूनही अनेक जण पसार आहेत. शेवटचा आरोपी गजाआड होईपर्यंत पोलीस घटनेचा तपास सोडणार नाहीत, असे यापूर्वीच मदने यांनी जाहीर केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe