अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. एकीकडे केंद्रीय मंत्रिमंडळानं सातव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्त्यात 28 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला असून 1 जुलैपासून कर्मचाऱ्यांना हा महागाई भत्ता देण्यात येणार आहे.
तर दुसरीकडे आता केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचार्यांना आणखी एक चांगली बातमी दिली आहे. यानुसार आता कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ताही वाढणार आहे. केंद्रीय कर्मचार्यांना ऑगस्टच्या पगारामध्येही वाढीव HRA देखील मिळणार आहे.
महागाई भत्ता 25 टक्क्यांहून अधिक झाला आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांचा HRA देखील वाढवण्यात आल्याचे सरकारच्या आदेशात म्हटले आहे.
अर्थ मंत्रालयाच्या आदेशानुसार आता केंद्रीय कर्मचार्यांना त्यांच्या शहरानुसार 27 टक्के, 18 टक्के आणि 9 टक्के घरभाडे भत्ता (HRA) मिळेल. हे वर्गीकरण X, Y आणि Z class शहरांनुसार आहे.
यानुसार आता X Class शहरात राहणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना अधिक HRA मिळणार आहे, त्यानंतर Y Class आणि त्यानंतर Z class शरातील कर्मचार्यांना घरभाडे भत्ता (HRA) मिळेल.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम