लहान मुलांसाठी आता आणखी एक कोरोना लस झाली मंजूर

Published on -

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- देशात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. यातच लहान मुलांसाठी फक्त भारत बायोटेकची कोवॅक्सिन ही एकच कोरोना लस आहे. मात्र आता एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.

लहान मुलांसाठी आणखी एका कोरोना लशीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. कॉर्बेवॅक्स कोरोना लसही लहान मुलांना दिली जाणार आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने यासाठी परवानगी दिलीय.

दरम्यान कॉर्बेवॅक्स हे मेड इन इंडिया लस आहे. भारतातील ही तिसरी स्वदेशी लस आहे. हैदराबादमधील बायोलॉजिकल ई कंपनीद्वारे ही लस तयार करण्यात आली आहे.

ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने यापूर्वीच 28 डिसेंबर रोजी आपत्कालीन परिस्थितीसाठी कॉर्बेवॅक्सला मर्यादित आधारावर मान्यता दिली आहे. आता डीसीजीआयने 12 ते 18 वयोगटातील मुलांसाठी या लशीला परवानगी दिली आहे.

कंपनीला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 5 ते 18 वर्षे वयोगटातील Corbevax च्या फेज II-III क्लिनिकल चाचणीसाठी परवानगी मिळाली.

कॉर्बेवॅक्स लस स्नायूद्वारे शरीरात टोचली जाईल आणि 28 दिवसांच्या आत दोन डोस घेतले जातील. ही लस दोन ते आठ अंश सेल्सिअस तापमानात साठवली जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News