अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:-सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतात कोरोना व्हायरसची लस, कोवॅक्सिनची वैद्यकिय चाचणी सुरू होणार आहे.
या वर्षी सप्टेंबरपर्यंत ही लस दाखल होऊ शकतो. ऑगस्ट २०२० मध्ये अमेरिकन लस कंपनी नोवावॅक्सनं सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियासह लायसेंस कराराची घोषणा केली होती.

नोवावॅक्सनं हा करार कोविड १९ लस ‘ एनवीएक्स-सीओ2373 सह विकासासाठी केला होता. ही लस भारतासह मध्यम आणि कमी लोकसंख्येच्या देशात उपलब्ध करून दिली जाणार आहे.
पूनावालांनी ने ट्वीट केलं आहे. त्यात नमुद करण्यात आलेल्या माहितीनुसार ”कोवोवॅक्सची वैदयकिय चाचणी भारतात सुरू होणार आहे.
या लसीचा विकास नोवावॅक्स आणि सीरम इंस्टिट्यूटद्वारे केला जाणार आहे. यावर्षी दुसऱ्या सहामाहीत अहवाल अपेक्षित आफ्रिका आणि ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या स्ट्रेनविरूद्ध लढण्यासाठी किती प्रभावी ठरते.
हे या लस चाचणीच्या माध्यमातून पाहिलं जाणार आहे. या लसीची क्षमता ८९ टक्के असल्याचं सांगितलं जात आहे. ही लस सप्टेंबर २०२१ पर्यंत तयार होऊ शकते.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|













