अहमदनगरच्या राजकारणात काहीही घडू शकतं….

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी अहमदनगरच्या राजकारणात शेवटपर्यंत काहाही घडू शकतं, असं वक्तव्य करून नव्या चर्चेला तोंड फोडलं आहे.

आमच्याकडे महापौरपदासाठी उमेदवार नसला तरी वरिष्ठांनी निर्णय घेतला तर आम्ही विकासाच्या मुद्द्यावर कोणासोबतही जाऊ शकतो, असे म्हणत विखे यांनी नव्या समीकराणांचीही शक्यता व्यक्त केली आहे.

विखे यांच्या उपस्थिती महापौरपदाच्या काळात शहरात केलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर डॉ. विखे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विखे म्हणाले, ‘यावेळी महापौरपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव आहे.

या प्रवर्गातील उमेदवार भाजपकडे नाही. त्यामुळे या पदावर आमचा दावा असू शकत नाही. आमच्याकडे उमेदवार नसल्याने आम्ही विरोधी पक्षात राहणार आहोत, ही आजची परिस्थिती आहे. मात्र, नगरचा इतिहास पाहता, निवडणूक होईपर्यंत पुढचे आत्ताच काही सांगता येत नाही.’

असे असले तरी यासाठी कोणासोबत जायचे, याचा वरिष्ठ पातळीवर निर्णय होऊ शकतो. त्याची आम्ही स्थानिक पातळीवर अंमलबजावणी करू.

शिवसेनेचे नगरसेवक मुंबईत आपल्याला भेटले होते, ही वस्तुस्थिती आहे, मात्र ते त्यांच्या कामासाठी आले होते व मी माझ्या कामाला गेलो होतो.

अहमदनगरला एकदा आमची भेट झाली होती. त्यावेळेला आमच्याशी महापौर पदाबाबत त्यांनी चर्चाही केली होती.

मात्र, राज्यात महाविकास आघाडी असल्यामुळे तुम्ही तुमच्या पक्षाचा निर्णय झाल्यानंतर त्यावर बोलणे उचित होईल, असे मी त्यांना सांगितले होते. असेही विखे म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe