अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:-नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील विविध कार्यकारी सेवा सह. सोसायटीची सभा संस्थेचे चेअरमन संतोष फलके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी व्हा.चेअरमन शिवाजी फलके, सोसायटीचे सदस्य पै.नाना डोंगरे, साहेबराव बोडखे, अण्णा जाधव, अरुण काळे,
मच्छिंद्र जाधव, अनिल फलके, द्रोपदाबाई कापसे, सुनिल कापसे, आशाबाई ठाणगे, भारत फलके, लहू गायकवाड आदी संचालक उपस्थित होते.
संस्थेचे सचिव विजय सोनवणे यांनी शासकीय विविध योजनांची माहिती देऊन कर्ज भरणार्या सभासदांचे आभार मानण्यात आले.
सहाय्यक मनोहर गायकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या सभेत थकबाकी संदर्भात चर्चा करुन वसुली करण्याचे आवाहन करण्यात आले.
सभासदांच्या अडी-अडचणी संदर्भात चर्चा करुन शेतकर्यांना जास्तीत जास्त कर्ज देण्याचा संकल्प करण्यात आला. आभार पै.नाना डोंगरे यांनी मानले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|