Apple iPad : भारतात ॲपलचा (Apple) चाहतावर्ग खूप आहे. परंतु, ॲपलने दिवाळीपूर्वी (Diwali) आपल्या ग्राहकांना (Apple customers) मोठा धक्का दिला आहे.
ॲपलने जुने आयपॅड (Old iPad) 6 हजार रुपयांनी महाग केले आहे. काही दिवसांपूर्वी ॲपलने 10th Gen iPad (10th Gen iPad) आणि iPad Pro ( iPad Pro) लाँच केले होते.

आयपॅड मिनी 2021 मध्ये लॉन्च करण्यात आला होता, ज्याची किंमत आता 49,900 रुपये आहे. ही किंमत 64GB + Wi-Fi मॉडेलची आहे. त्याची किंमत तीन हजार रुपयांनी वाढली आहे.
त्याच वेळी, 6GB + LTE मॉडेलची किंमत आता 64,900 रुपये आणि 256GB + Wi-Fi 64,900 रुपये झाली आहे. आयपॅड मिनीची 256GB + LTE आवृत्ती आता 79,900 रुपयांना खरेदी केली जाऊ शकते.
iPad Air 2022 साठी 64GB + Wi-Fi ची किंमत पूर्वी 54,900 रुपयांवरून 69,900 रुपये झाली आहे. iPad Air 2022 चा 64GB + LTE 74,900 रुपयांना आणि 256GB + Wi-Fi 74,900 रुपयांना आणि 256GB + सेल्युलर मॉडेल 89,900 रुपयांना खरेदी करता येईल.
iPad (10th Gen) 44,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आला आहे आणि नवीन iPad Pro 81,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आला आहे. 7,000 कॅशबॅक HDFC बँक कार्ड किंवा अमेरिकन एक्सप्रेस कार्डवर उपलब्ध आहे.