अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- जागतिक स्तरावरील नावलौकिक असलेल्या श्री.क्षेत्र शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जी. के. दरंदले यांची तर उप कार्यकारी अधिकारी म्हणून तांत्रिक विभागाचे नितीन शेटे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती अध्यक्ष भागवत बानकर यांनी दिली.
देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर यांच्या अध्यक्षतेखाली विश्वस्त मंडळाच्या आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत बऱ्याच महिन्यापासून रिक्त असलेल्या दोन्ही पदासाठी मुलाखती घेऊन जी.के.दरदले यांची मुख्य कार्यकारी अधिकारी तर नितीन शेटे यांची उपकार्यकारी पदी निवड झाल्याचे घोषित केले.
जी. के. दरदले 24 वर्षापासून देवस्थानच्या सेवेत असून त्यांनी सहा वर्षांहून अधिक काळ सहायक कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.नितीन शेटे यांनीही सहा वर्षे तांत्रिक अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.
नूतन अधिकार्यांचा सन्मान देवस्थानच्या वतीने करण्यात आला. मंत्री ना.शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली शनी भक्तांना सुविधा उपलब्ध करून त्या पुरवण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे श्री. दरंदले म्हणाले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम