अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेच्या राज्य कार्यकारी सदस्यपदी रेव्ह. अश्विन शेळके यांची नियुक्ती करण्यात आली.
परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अनिल भोसले यांच्या आदेशान्वये सरचिटणीस प्रफुल्ल असुर्लेकर यांनी शेळके यांच्या नियुक्तीची घोषणा करुन त्यांना नियुक्तीपत्र दिले.
रेव्ह. शेळके यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून ख्रिस्ती बांधवांना संघटित केले आहे. सामाजिक बांधिलकी ठेवून सुरु असलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची राज्य कार्यकारी सदस्यपदी संधी देण्यात आल्याचे प्रफुल्ल असुर्लेकर यांनी सांगितले.
रेव्ह. शेळके यांनी संघटनेच्या माध्यमातून ख्रिस्ती समाजाचे संघटन मजबूत करुन समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या निवडीबद्दल त्यांचे ख्रिस्ती विकास परिषदेचे उपाध्यक्ष अॅड. सिरील दारा, विश्वस्त उद्योजक अविनाश काळे, सॉलोमन गायकवाड, जिल्हाध्यक्ष दीपक कदम, संदेश भाकरे, प्रा.पंकज लोखंडे, रवी सातपुते, सिस्टर सरोज साळवे, प्रा. अशोक डोंगरे यांनी अभिनंदन केले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम