नगरचे बिपिन आंबेडकर यांची डीवायएसपीपदी नियुक्ती

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:- केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या केंद्रीय शास्त्र पोलीस फोर्स युपीएससी व सीएपीएफ 2019 असिस्टंट कमांडंट डीवायएसपी परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये एमआयडीसी येथील बिपिन आंबेडकर यांनी या परीक्षेत यश संपादन केले

असून, त्यांची डीवायएसपीपदी वर्णी लागली आहे. ते अभिजीत लेदर प्रॉडक्टचे मालक बाबासाहेब आंबेडकर यांचे चिरंजीव आहे. बिपिन आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण वडगाव गुप्ता येथे झाले असून,

त्यांनी व्हीआयटी पुणे येथून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. डीवायएसपी झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe