विजय साळवे यांची आरपीआयच्या युवक शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) पक्षात भिंगार येथीलसामाजिक कार्यकर्ते विजय साळवे यांच्यासह युवा कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी साळवे व त्यांच्या समर्थकांचे पक्षात स्वागत करुन साळवे यांची युवक शहर जिल्हाध्यक्षपदी निवडीची घोषणा केली.

भिंगार येथे झालेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमाप्रसंगी आरपीआयचे कार्याध्यक्ष दानिश शेख, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष नईम शेख, जमीर इनामदार, संतोष पाडळे, विकी प्रभळकर, कृष्णा खिळे, अभिषेक बुगे, करण भिंगारदिवे, राहुल सोळंकी, आशु बनसोडे, यश घोरपडे, जालिंदर जगताप, प्रदीप शेलार, अक्षय साळवे, विशाल भिंगारदिवे, प्रितम हरबा, जॉय ओहळ, बंटी चव्हाण,

अनिकेत येणे, आदित्य मंडलिक, कार्तिक भोईटे, सनी साळवे, मयूर साळवे, सनी ओहळ, गौरव जगताप, तेजस माणकेश्‍वर, सोन्या गुंजाळ आदिंसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुशांत म्हस्के म्हणाले की, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेला पक्ष आहे.

सर्व बहुजनांना आपले प्रश्‍न निर्भीडपणे मांडून न्याय मिळण्यासाठी या पक्षाची बांधणी करण्यात आलेली आहे. पक्षाचे कार्य फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराने सुरु असल्याने युवकांचा प्रतिसाद मिळत आहे. सर्व समाजाला बरोबर घेऊन व त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आरपीआय कटिबध्द आहे.

युवकांची मोठी फळी आरपीआयशी जोडली जात असून, लवकरच शहरासह जिल्ह्यात शाखा सुरु करुन युवकांना पक्षाच्या कार्यात सामावून घेतले जाणार आहे. भविष्यात महापालिका व इतर निवडणुका स्वबळावर लढविण्यासाठी पक्षाचे नियोजन सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नूतन पदाधिकारी विजय साळवे युवा कार्यकर्त्यांनी आरपीआयच्या माध्यमातून युवकांचे संघटन करुन सामाजिक प्रश्‍न सोडविण्यास पुढाकार घेणार असल्याचे सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe