ग्रामसेवकाचा मनमानी करभार; आठ दिवसांपासून गावात फिरकलेच नाही

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :- कोरोनाचा काळ सुरु असला तरीही सरकारी कार्यालये सुरूच आहे. कमी लोकांच्या उपस्थित कामकाज सुरूच आहे.

असे असतानाही कर्जत तालुक्यातील सिद्धटेक ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक गेल्या आठ दिवसांपासून गावात फिरकले नाहीत.

यामुळे कोरोना काळात त्यांचे गावाकडे दुर्लक्ष झाले, असा आरोप करत ग्रामस्थांनी ग्रामसेवकांच्या खुर्चीला बुधवारी हाल घालून निषेध नोंदविला.

दरम्यान सतत गैरहजर असणारे ग्रामसेवक अमोल बरबडे हे कर्जत तालुक्यातील सिद्धटेक ग्रामपंचायत येथे ग्रामसेवक आहे. कोरोनाच्या काळातही ते शासनाच्या आदेशाला डावलून मनमानी कारभार करत आहे. ते तीन महिन्यापासून सतत गैरहजर आहेत.

त्यामुळे सरपंच पल्लवी सुजित गायकवाड यांनी त्यांना २६ फेब्रुवारीला मुख्यालयी राहण्याबाबत पत्र काढून सूचना केल्या होत्या.

परंतु, त्यावरही बरबडे मुख्यालयी न राहता कर्जत येथे राहत असून ग्रामपंचायत कार्यालयात कायम गैरहजर राहत आहेत, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सध्या सिद्धटेकमध्ये कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. गावातील दोन व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सरपंच पल्लवी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना ग्राम समितीची स्थापना करण्यात आली. यात सरपंच अध्यक्ष तर ग्रामसेवक व पोलीस पाटील सचिव आहेत.

आशा सेविका, अंगणवाडी सेविका, तलाठी यांचा या समितीत सहभाग आहे. मात्र या समितीमधील पोलीस पाटील कोरोना बाधित असल्याने ते पंधरा दिवसांपासून हजर नाहीत,

तर ग्रामसेवक सतत गैरहजर असतात, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांच्या रिकाम्या खुर्चीला ग्रामस्थांनी हार घालून निषेध नाेंदविला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe