शाकाहारी आहात? ‘या’पदार्थांचा करा आहारात समावेश यामुळे होईल कोरोनापासून बचाव

Ahmednagarlive24
Published:

कोरोनाशी लढण्यासाठी सध्या जगभर लस शोधण्याचे काम सुरु आहे. परंतु सध्या आपली इम्युनिटी पॉवर वाढवणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

करोना व्हायरसशी लढण्यासाठी सध्या या ‘ड’ जीवनसत्वाची गरज शरीराला मोठ्या प्रमाणात आवश्यक आहे.त्यासाठी योग्य आहार आणि दिनचर्या असणे गरजेचे आहे.

आपल्या शरीराला आवश्यक असणाऱ्या जीवनसत्त्वांपैकी सगळ्यात महत्त्वाचं असणारे जीवनसत्त्व ‘ड’ हे आपल्या शरीराला विविध रोगांपासून दूर ठेवण्यात मोलाची भूमिका बजावते. हे जीवनसत्त्व ‘ड’ सामान्यत: प्राणीजन्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतं.

म्हणूनच मांसाहारी लोकांमध्ये हे जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात आढळतं, तर शाकाहारी लोकांमध्ये फार कमी प्रमाणात आढळतं. शाकाहारी लोक आपल्या आहारात मशरूम, फोर्टिफाईड, दुध, इंसटेंट, ओटमील, जीवनसत्त्व ‘ड’ च्या टॅबलेट्स, संत्रीचा रस यांच सेवन करून जीवनसत्त्व ‘ड’ ची कमी भरून काढू शकतात.

१) कोवळी सूर्यकिरणे सूर्याची किरणे हे जीवनसत्त्व ‘ड’ मिळवण्याचा एक नैर्सगिक मार्ग आहे. दरोरोज सकाळी पहाटे शक्य असल्यास बाहेर बसून सूर्याची किरणे शरीराला शोषु द्यावीत. यामुळे जीवनसत्त्व ‘ड’ तर मिळतेच पण झोप सुद्धा छान लागते.

२)मशरूम उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात मशरूमची भाजी खाल्ल्याने आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणावर जीवनसत्त्व ‘ड’ मिळते. यात पोटॅशियम, प्रोटीन आणि सेलेनियम सुद्धा असतं.त्यामुळे आपली हाडे अतिशय बळकट आणि निरोगी राहतात.

३)फोर्टिफाइड दूध गायीचं दूध प्यायल्याने शरीरात असणारी जीवनसत्त्व ‘ड’ ची कमी भरून निघते. पण हि गोष्ट पूर्णपणे सत्य नाही. म्हणून गरजेचं आहे कि तुम्ही फोर्टीफाईड दुध प्यायला हवं, कारण यातूनच तुम्हाला आवश्यक असणारी जीवनसत्त्व ‘ड’ ची मात्रा मिळते.

गायीच्या दुधात जीवनसत्त्व ‘ड’ फोर्टीफाईड असेल तर त्याचे लाभ अनेक पटीने वाढतात. गायीच्या दुधा व्यतिरिक्त बाजारात जीवनसत्त्व ‘ड’ फोर्टीफाईड सोया दूध मिळत. तेही लाभदायक ठरू शकते.

४) संत्रीचा ज्यूस संत्री सुद्धा मशरूम सारख जीवनसत्त्व ‘ड’ मिळवण्याचा एक नैसर्गिक स्त्रोत आहे. सध्या बाजारात संत्रीचा ज्यूस हा १२ महिने उपलब्ध असतो. त्यामुळे तुम्हाला संत्र्यातून जीवनसत्त्व ‘ड’ मिळवण्याची फळे खाण्याची गरज नाही. ज्यूस पिलं तरी त्यातून हे जीवनसत्व मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment