अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील मागील मागील आठवड्यात पैशांसाठी जुन्या नोकरानेच खून केल्याची घटना अद्याप येथील नागरिक विसरले नाहीत. तोच परत काल एका व्यापाऱ्यावर सशस्त्र हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे.
रामेश्वर पालीवाल असे जखमी व्यापाऱ्याचे नाव आहे. याबाबत सविस्तर असे की, श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे व्यवसाय करण्यासाठी बाहेरगावहून आलेल्या व्यक्तीवर एका व्यक्तीने चाकूसारख्या धारदार हत्याराने हल्ला केला आहे. ही घटना काल सोमवारी घडली.
यात तो व्यापारी जखमी झाला असून या घटनेने प्रचंड दहशतीखाली आहे. व्यवसाय करण्यासाठी बाहेरगावहून रामेश्वर पालीवाल बेलापूर येथे आले आहेत. भाडोत्री खोली घेऊन त्यांनी व्यवसाय सुरू केला आहे. दोन दिवसांपुर्वी बाहेरगावच्या एका व्यक्तीने पालीवाल यांना मारहाण केली.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच व्यक्तीने पालीवाल यांच्यावर धारदार हत्याराने हल्ला केला. त्यात पालीवाल यांना दोन तीन ठिकाणी जखमा झालेल्या आहेत. या हल्ल्यामुळे पालीवाल प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत. या हल्ल्याचे नेमके कारण समजू शकले नाही.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|