अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- नांदेडमध्ये कोविड काळामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात, मराठा समाजाने मोर्चा काढला आहे.
आणि या मोर्चाचे नेतृत्व खासदार संभाजीराजे यांनी केले.कोविड काळात मोर्च्यांना परवानगी नसताना, मोर्चा कसा काढला? त्यामुळं पोलिसांनी संभाजीराजेंना तात्काळ अटक केली पाहिजे अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.
माननीय सर्वोच्च न्यायालयाने मराठ्यांचा आरक्षणाचा असैविधानिक घोषित केल्यानंतर तसेच माननीय उच्च न्यायालय, मुंबई यांनी निरीक्षणं नोंदवली आहेत की, कोविड संक्रमण काळात असे मोर्चे, सभा झाल्या नाही पाहिजे. त्याच धर्तीवर परत असे कृत्य करणे हे न्यायालयाच्या विरोधात आहे.
त्यामुळं खासदार संभाजीराजे भोसले यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याचबरोबर गुणरत्न पुढे म्हणाले की, अशोक चव्हाण हे मराठा आरक्षण उपसमितीचे नेतृत्व करताहेत. ते नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांना सुद्धा पोलीस अधीक्षक शेवाळे साहेब असतील किंवा पोलिस विशेष पोलीस महानिरीक्षक तांबोळी असतील,
यांनी त्यांना तातडीने अटक केली पाहिजे. अजित पवार यांच्या घरासमोर इतर लोक मोर्चे काढतात, तेव्हा त्यांना पंधरा-पंधरा दिवस जेलमध्ये टाकता. आणि खासदार संभाजी राजेंना अशा प्रकारचा विशेष व्यवस्था का? ते कायद्यापेक्षा मोठे आहेत का? असा सवाल गुणरत्ने यांनी केला आहे.
यापूर्वी सुद्धा खासदार संभाजीराजे यांनी नक्षलवाद्यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते, त्यामुळे मी पोलीस अधीक्षक यांना संभाजीराजे यांना अटक करण्याची मागणी करत आहे, असं सदावर्ते म्हणालेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम