तलवारीचा धाक देत मारहाण करून रस्तालूट करणारे जेरबंद

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- तलवारीचा धाक दाखवून मारहाण करून रसतालुट करणाऱ्या आरोपींना जेरबंद करण्यास राहाता तालुक्यातील लोणी पोलिसांना यश आले आहे.

राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथे दिनांक ४ जून रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अक्षय लहुजी खैरे हा वडिलांना घेऊन तिसगाव कडे जाणाऱ्या लोहगाव चौकाकडे येत असताना समोरून आलेले मनीष सारसर व अमर भोसले

यांनी त्यांच्याकडील पल्सर गाडी आम्हाला आडवी लावून आमचा रस्ता आडवला व त्यांच्याकडील असलेली तलवारीचा धाक दाखवून चला तुमच्या खिशातील पैसे काढा अशी धमकी देऊन मारहाण करण्यात सुरुवात केली.

त्यानंतर मनीष सारसर याने फोन करून अजून त्याचे दोन साथीदारांना बोलावून घेतले व त्यांनी आमच्या खिशात बळजबरीने हात घालून रोख रक्कम दोन हजार व एक बारा हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून घेतला व त्यानंतर त्यांनी मला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली

माझ्या डोक्यात दारूच्या बाटल्या फोडल्या माझ्या पाठीवरून त्यांच्याकडील मोटरसायकल घातली अशी फिर्याद अक्षय लहुजी खैरे यांनी लोणी पोलीस स्टेशनला दिली. सदर घटनेचे आरोपी मनीष नरेश सारसर वय पंचवीस वर्ष

तसेच संकेत देवेंद्र भोसले (वय 21 वर्ष) ऋषिकेश बाळासाहेब सरोदे( वय 21 वर्ष) व अमर बाळू भोसले यांच्याविरुद्ध भादवि ३९७,३४१,३४ आर्म एक्ट कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून

सदर गुन्ह्यातील तीन आरोपी पकडण्यात लोणी पोलिसांना यश मिळाले आहे तर एक आरोपी फरार आहे अशी माहिती लोणी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News