तोफखाना पोलिसांनी जप्त केला बेकायदेशीर दारूसाठा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-  शहरातील तोफखाना पोलीस पथकाने धडाकेबाज कारवाई करत बेकायदेशीर लपवून ठेवण्यात आलेला दारू साठ्यावर छापा टाकून हा साठा जप्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नगर शहरातील भिस्ताबाग चौकातील वृद्धेश्वर पानस्टाॅलमध्ये एक जणाने देशी दारूचा साठा लपवून ठेवला होता.

तो साठा बेकायदेशीर विक्री करीत असल्याबाबत तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस पी गायकवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती.

दरम्यान गायकवाड यांनी तोफखाना पोलिस पथकास सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस पथकाने भिस्तबाग चौक येथे सापळा लावून शिवा गोपाळ शर्मा (वय 25, रा. श्रमिकनगर पाईपलाईन रोड,अहमदनगर ) याला ताब्यात घेतले.

शर्मा याने लपवून ठेवलेला वृद्धेश्वर पान स्टाॅलमधील 47 हजार 424 रुपयाचे संजीवनी देशी दारूचे 19 बंद बॉक्स काढून दिले.

शर्मा व त्याचा मालक काशिनाथ बबन शिंदे याच्याविरुद्ध पोकॉ शैलेश गोमसाळे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe