चाकू हल्ला करणाऱ्या आरोपीला शोधण्यात तोफखाना पोलीस ठरतायत अपयशी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- सराईत गुन्हेगार विजय पठारे व त्याचे साथीदारांकडून शहरात दहशत निर्माण करून एकावर चाकू हल्ला केल्याची घटना घडली होती. तेव्हापासून हा सराईत गुन्हेगार पसार झाला आहे.

दरम्यान या गुन्हेगाराला शोधण्यात तोफखाना पोलिसांना अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीसही त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान पठारे याचा साथीदार संतोष नवगिरे याला पोलिसांनी अटक केली असून तो पोलीस कोठडीत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, 19 मे रोजी दिनेश मनोहर पंडित हे त्यांच्या सिध्दार्थनगरमधील सुडके मळ्यात घरासमोर उभे असताना दुचाकीवरून आलेल्या

विजय राजू पठारे (रा. सिध्दार्थनगर), संतोष नवगिरे (रा. कल्याणरोड, नगर), गणेश सुरेश पठारे व विजय पठारेचा एक मित्र यांनी पंडित यांना शिवीगाळ करत मारहाण केली. यानंतर विजय पठारे याने त्याच्याकडील चाकूने पंडित यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले.

याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल आहे. यापूर्वी देखील पठारे टोळीने बालिकाश्रम रोडवर दोन दुकानावर दरोडा टाकला होता.

दरम्यान पोलीस अधीक्षकांनी पठारे व त्याच्या अन्य साथीदारांना तात्काळ अटक करण्याच्या सूचना केल्या आहेत.मात्र अद्यापही हा सराईत गुन्हेगाराला पकडण्यात पोलिसांना अपयश येत असल्याचे दिसून येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe