अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- उत्तर प्रदेशातील एका खासगी रुग्णालयाने ‘मॉक ड्रिल’च्या नावाखाली ५ मिनिटांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा बंद केल्यामुळे तब्बल २२ रुग्णांचा तडफडून मृत्यू झाल्याची गंभीर बाब मंगळवारी उजेडात आली आहे.
गत २६ एप्रिल रोजी ही घटना घडली. पण, त्याचा एक व्हिडिओ आता उजेडात आला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याप्रकरणी राज्यातील भाजप सरकारवर निशाणा साधत या क्रूर गुन्ह्यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आग्रा येथील श्री पारस रुग्णालयात ही घटना घडली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे एप्रिलमध्ये सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता.
हे रुग्णालयही याला अपवाद नव्हते. त्यामुळे रुग्णालयाचे मालक डॉक्टर अरिंजय जैन यांनी ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांना त्यांना अन्यत्र हलवण्याचे निर्देश दिले होते. पण, नातेवाइकांनी त्यास नकार दिला होता.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम