गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात तब्बल ३२ मृत्यू , जाणून घ्या तुमच्या परिसरातील कोरोनाचे सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :-  जिल्ह्यात आज ४१०७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख २१ हजार १३७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९१.३७ टक्के इतके झाले आहे.

तसेच गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात तब्बल ३२ मृत्यू झाले आहेत,अहमदनगर जिल्ह्यात आज रूग्ण संख्येत २६३७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १८ हजार ६०५ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २२, अकोले ०३, जामखेड ०२, कर्जत ६०, कोपरगाव २१, नगर ग्रामीण ६०, पारनेर ०२, पाथर्डी ०१, राहता ०३, राहुरी १९, शेवगाव ०१, श्रीरामपूर ०३, कॅंटोन्मेंट १३ आणि इतर जिल्हा ११ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १२०, अकोले २३, जामखेड ८१, कर्जत १०, कोपरगाव २२, नगर ग्रा.७१, नेवासा ७१, पारनेर ९३, पाथर्डी ७४, राहाता ६७, राहुरी ३६, संगमनेर ९९, शेवगाव १५५, श्रीगोंदा १९, श्रीरामपूर ११७, कॅंटोन्मेंट बोर्ड ०८ आणि इतर जिल्हा २१ आणि इतर राज्य ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १३२८ जण बाधित आढळुन आले. मनपा २१, अकोले ५८, जामखेड ४७, कर्जत ४८, कोपरगाव ६९, नगर ग्रा. ५३, नेवासा ८०, पारनेर १३६, पाथर्डी १०१, राहाता ६५, राहुरी ६७, संगमनेर १७३, शेवगाव ६०, श्रीगोंदा २७४, श्रीरामपूर ६५ आणि इतर जिल्हा ११ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ६७१, अकोले १४४, जामखेड १०७, कर्जत २०४, कोपरगाव ३१९, नगर ग्रामीण ३५७, नेवासा २०१, पारनेर ३३२, पाथर्डी १६४, राहाता २६२, राहुरी २६०, संगमनेर २०९, शेवगाव १९८, श्रीगोंदा ४३५, श्रीरामपूर ६१, कॅन्टोन्मेंट ४७, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा १३२ आणि इतर राज्य ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe