अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- आपण अपघातात दोन तिन अथवा यापेक्षा कमी अधिक वाहनांचा अपघात झाल्याचे ऐकले किंवा वाचले असेल. मात्र श्रीगोंदा तालुक्यात एकाच ट्रकमुळे चक्क५०दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. ओला कात घेवून जाणारा ट्रक रस्त्यावर उलटला. परिणामी या ट्रकमध्ये असलेले रसायन रस्त्यावर पसरून चक्क ५० दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, घारगाव येथे सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास दौंड येथून नगरकडे ओला कात घेऊन चाललेला (एम.पी ०९ एच.एच ४९३७) हा मालट्रकला नगर दौंड महामार्गावर अपघात होउन पलटी झाला. ट्रकचालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाला.
या अपघातात ट्रक ड्रायव्हर आणि क्लिनर गंभीर जखमी झाले. अपघातग्रस्त ट्रकमधील ओला कात रस्त्यावर पसरल्याने रस्त्यावरून जाणारे सुमारे ५० दुचाकीस्वार घसरून रस्त्यावर पडल्याने जखमी झाले. या अपघाताबाबत माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|