वऱ्हाडी मंडळींवर काळाचा घाला गाडी दरीत कोसळल्याने तब्बल ९ जणांचा मृत्यू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- लग्नाला जाणाऱ्या वऱ्हाडी मंडळींवर काळाने घाला घातला आहे. लग्नाला जाणारी गाडी दरीत कोसळल्याने तब्बल ९ जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

हिमाचल प्रदेशच्या सिरमौर जिल्ह्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

सिरमौर जिल्ह्याच्या पौंटा साहिब भागामध्ये हा प्रकार घडल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.

हिमाचल प्रदेशच्या सिरमौर जिल्ह्यातील पच्छड विभागाच्या बाग पाशेंग या डोंगराळ भागामधून वऱ्हाडींना घेऊन जाणाऱ्या एका पिकअप व्हॅनवरील चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्यामुळे ही गाडी थेट घाटातून खाली येऊन कोसळल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. यासंदर्भात नेमकं अपघाताचं कारण आणि मृतांची ओळख यासंदर्भात पोलीस तपास करत आहेत,

अद्याप या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या ९ जणांची ओळख पटलेली नसून जखमी झालेल्या ३ व्यक्तींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती पौंटा साहिपचे पोलीस उपअधीक्षक बीर बहादूर यांनी दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe