गुरु अर्जुन देव कोविड केअर सेंटर मधून तब्बल एक हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :-कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेत घर घर लंगर सेवेच्या माध्यमातून सर्वसामान्य कोरोना रुग्णांसाठी निशुल्क सेवा देणार्या गुरु अर्जुन देव कोविड केअर सेंटर मधून तब्बल एक हजार एकतीस रुग्ण बरे होऊन घरी परतले.

4 मार्च पासून घर घर लंगर सेवेच्या माध्यमातून व महापालिकेच्या सहकार्याने हॉटेल नटराज व जैन पितळे वसतीगृह येथे कोविड सेंटर सुरु करण्यात आले. जैन पितळे येथे विशेष महिलांसाठी कोविड सेंटर कार्यरत आहे.

या कोविड सेंटरमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण उत्तम असून, हॉटेल नटराज येथून 756 तर जैन पितळे वसतीगृह येथून 275 महिला रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. लंगर सेवेच्या वतीने हे दोन्ही कोविड सेंटर निशुल्क चालविण्यात येत आहे.

यामध्ये रुग्णांना सकाळचा नाष्टा, दुपार व रात्रीचे जेवण देखील देण्यात येते. रुग्णांसाठी सकाळचा नाष्टा हॉटेल रॉयल येथे तर दोन वेळचे जेवण हॉटेल अशोका येथे तयार केले जाते. योग शिक्षक दीपक पापडेजा रुग्णांकडून सकाळी योगासने करुन घेतात.

तर रुग्णांच्या मनोरंजनासाठी विविध खेळाचे साहित्य देखील उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. निसर्गरम्य मोकळ्या वातावरणात रुग्णांना घरासारखे वातावरण उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. कोरोना झालेल्या

रुग्णांना घरी न थांबता तात्काळ कोविड सेंटरमध्ये दाखल होण्याचे आवाहन लंगर सेवेच्या वतीने श्री वधवा यांच्या वतीने करण्यात आले आहे. गुरु अर्जुन देव कोविड केअर सेंटरसाठी लायन्स क्लब, अहमदनगर पोलीस दल, शीख, पंजाबी, जैन, सिंधी, गुजराती आणि सर्व समाजाचे योगदान लाभत आहे.

या कामासाठी महापालिका आयुक्त शंकर गोरे, पोलीस अधिक्षक मनोज पाटील, उपायुक्त योगेश डांगे, पोलीस उपअधिक्षक विशाल ढुमे, डॉ. सुज्योत सैंदाणे, डॉ. प्रदीप कळमकर, डॉ. सलमान शेख, योगेश तांबे, परिचारिका, वॉर्डबॉय, स्वच्छता कर्मचारी सहकार्य देत आहे.

कोविड सेंटरच्या सर्व कार्यासाठी लंगर सेवेचे हरजीतसिंग वधवा, जनक आहूजा, राहुल बजाज, प्रीतीपालसिंग धुप्पड, किशोर मुनोत, प्रशांत मुनोत, कैलास नवलानी, राहुल बजाज, राजा नारंग, सतिश गंभीर, राजेंद्र कंत्रोद,

सनी वधवा, आदित्य छाजेड, कबीर धुप्पड, टोनी कुकरेजा, राजेश कुकरेजा, मन्नू कुकरेजा, सुरेश कुकरेजा, काली लालवानी, नारायण अरोरा, गोविंद खुराणा, जय रंगलानी, राहुल शर्मा, शरद बेरड, प्रमोद पांतम, पुरुषोत्तम बेती, संदेश रपारिया, सुनील मुळे, विपुल शाह आदी परिश्रम घेत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe