अहमदनगर जिल्ह्यातील ह्या शाळेतील तब्बल सहा शिक्षक कोरोनाबाधित !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:- श्रीरामपुर तालुक्यातील अनेक शैक्षणिक संकुलात कोरोनाने शिरकाव केला असून बेलापूर येथील शैक्षणिक संकुलात तब्बल सहा शिक्षक कोरोना बाधित निघाल्याने काही दिवस शैक्षणिक संकुल बंद ठेवण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला.

जिल्ह्यात कोरोनाचा ग्राफ ५०० च्या वर गेला. शिवाय आता शिक्षक, विद्यार्थी व त्यांचे कुटुंबातील सदस्यही बाधित होऊ लागले. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून इतर जिल्ह्यात ३१ मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला.

नगर जिल्ह्यातही ३१ मार्चपर्यंत शाळा महाविद्यालये बंद ठेवावेत, अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचेकडे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघटनेने केली असल्याची मागणी अध्यक्ष सुनील पंडित यांनी केली. श्रीरामपुरात कोरोना रुग्ण वाढीचा वेग वाढू लागला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe