अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढतच नागरिक देखील आता स्वतःच्या संरक्षणासाठी व या महामारीचा आपल्याला प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सरसावले आहे.
यामुळे जिल्ह्यात सर्वत्रच लसीकरणासाठी लांबच लांब रांगा दिसून येत आहे. यामुळे आता लसीकरण केंद्रावर पोलीस बनोबस्त मागवण्यात येत आहे.
नुकतेच कर्जत तालुक्यातील राशीन प्राथमिक आरोग्य रूग्णालयात कोरोना लसीकरणासाठी शुक्रवारी पहाटेपासूनच रांगा लावल्या.
अचानक झालेल्या गर्दीने आरोग्य कर्मचाऱ्यांची धांदल उडाली. केवळ दोनशेच डोस मिळाल्याचे समजल्याने गोंधळ सुरू झाला. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांची तातडीने पोलिसांना त्या ठिकाणी बोलाविले. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात लसीकरणास सुरुवात झाली.
लसीकरण केंद्रावर फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल :– तालुक्यात ४५ वयोगटातील नागरिकांनी लसीकरणासाठी येऊन टोकन घ्यावे, असे आवाहन प्राथमिक रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले होते.
नागरिकांनी टोकन घेण्यासाठी पहाटेपासून आरोग्य केंद्राच्या आवारात नंबर लावत गर्दी केली. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.
२०० डोस येथील आरोग्य केंद्रास उपलब्ध झाल्याचे सांगण्यात आले. तसेच त्यातील १०० डोस हे दुसरा डोस घेणाऱ्यांना तर १०० डोस नव्याने लस घेणाऱ्यांना दिले जाणार असल्याचे सांगताच गोंधळ उडाला. त्यानंतर पोलिसांना बोलाविण्यात आले. त्यानंतर ५० टक्के नागरिक निघून गेले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|