बघता बघता नवी कोरी गाडी डोळ्यासमोरच जळून झाली खाक

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:- कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत नपावाडी येथील कार मालक शशिकांत भरणे यांनी नुकतीच नव्याने घेतलेली एर्टीगा कार घेऊन

ते आपल्या चालकासह वैजापूरकडे जात असताना त्यांच्या गाडीतील बोनेटमधून अज्ञात कारणाने आग लागून त्यात त्यांची सुमारे पाच लाखांची कार जाळून खाक झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, नपावाडी येथील फिर्यादी शशिकांत भरणे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपण व आपला चालक प्रवीण अशोक भाकरे असे दोघे सदर गाडीमध्ये होतो. तसेच माझे सोबत विशाल रमेश दहिवाल होते.

दरम्यान सायंकाळच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवारातून प्रवास करत असताना अचानक कारच्या बोनेट मधून धूर येऊ लागला असल्याचे आमच्या निदर्शनास आले बघता-बघता आगिने रौद्र रूप धारण केले व कार जळून खाक झाली.

गाडीला लागलेली आग विझविण्यास काही साधन नसल्याने त्याना काही एक उपाय करता आले नाही. या घटनेत त्यांचे नव्या कारचे सुमारे पाच लाखांचे नुकसान झाल्याचे त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News