अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- तू अपशकूनी व पांढऱ्या पायाची आहे. तुझ्यामुळे तूझी सासू मयत झाली. असे आरोप करून नव विवाहित तरूणीचा छळ करून घरातून निघून जाण्यासाठी तिच्यावर काळा जादूटोना करण्यात आला.
या घटनेबाबत श्रीरामपुर येथील एका डाॅक्टर व मांत्रीकासह एकूण सहा जणांवर राहुरी पोलिसात आज शुक्रवार दि 18 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय. येवले आखाडा येथील सौ. अश्विनी विकास लवांडे हल्ली या तरूणीचा विवाह श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव डॉ. विकास लवांडे याच्यासोबत झाला होता.
अश्विनी लवांडे ही श्रीरामपूर येथील कारेगाव येथे तिच्या सासरी नांदत असताना तिची सासू ब्रेन ॲट्याक ने मयत झाली होती. त्यानंतर सासरच्या लोकांनी सौ. अश्विनी लवांडे हिला तू अपशकूनी व पांढऱ्या पायाची आहे. तू येथे नांदायला आल्यामुळेच तूझी सासू मयत झाली.
असे आरोप करून तिचा छळ करण्यास सुरुवात केली. दरम्यान तिच्या सासरच्या लोकांनी एका मांत्रीक बाबाला बोलावून सौ. अश्विनी हिच्यावर काळा जादूटोन्या सारखा प्रकार सुरू केला. तिच्या डोक्यावर लिंबू कापून, डोक्याचे केस उपटून, अंगावरील कपडे कापून ते काळ्या बाहूलीला चिटकवणे.
अमावस्येच्या रात्री अकरा वाजे नंतर राखेचे गोल रिंगण करुन त्यात सौ. अश्विनी हिला बसवून मंत्र उच्चार करणे असे प्रकार तिच्यावर करण्यात आले. तू उपचार करून घेतले नाही तर घरात वाईट प्रकार घडत राहतील. अशी सासरच्या लोकांनी सौ. अश्विनी हिला धमकी दिली.
माहेरच्या लोकांना काही टेंशन नको. म्हणून तिने कोणाला काही सांगितले नाही. मात्र १६ जून २०२१ रोजी सौ. अश्विनी हिच्या वडिलांनी अश्विनीकडे काळी बाहूली, लिंबू व तावीत अशा वस्तू पाहिल्यावर हा काय प्रकार आहे असे विचारले असता सर्व प्रकार त्यांना समजला.
त्यांनी तात्काळ महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती अहमदनगरचे पदाधिकारी महेश थनवटे राहणार राहुरी यांना सदर प्रकार सांगितला व त्यांचेसह राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. सौ. अश्विनी लवांडे हिच्या फिर्यादीवरून पोलिसांत पती डाॅ. विकास विश्वनाथ लवांडे सासरा विश्वनाथ रखमाजी लवांडे नणंद पुनम विश्वनाथ लवांडे तिघे राहणार कारेगाव तसेच
मामा सासरा किशोर सिताराम दौड मामी सासू प्रमिला किशोर दौड दोघे राहणार मातापुर ता. श्रीरामपुर आणि जादूटोना करणारा एक मांत्रीक अशा सहा जणांवर अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम