अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- करोना काळामध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आशा व गटप्रवर्तक यांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
कर्जत तहसील कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समिती यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. आशा स्वयंसेविका यांना मानधन ऐवजी कायमस्वरुपी नेमणूक करावी. कोविड काळामध्ये व लसीकरण करत असल्यामुळे त्यांना तीन रुपये रोज असा मोबदला दिला जातो.

file photo
हा एक प्रकारे अन्याय आहे. सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आशा सेविकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे करोना काळामध्ये आरोग्य यंत्रणा अडचणीत सापडली आहे.
दरम्यान मानधन व अन्य मागण्यांवर विचार व्हावा, यासाठी त्यांनी आमदार रोहित पवार यांच्यासह प्रशासनाला लेखी निवेदन दिले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम