अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- आगीच्या तडाख्यात संसारपयोगी वस्तू जळुन खाक झाल्या आहेत.राहुरीच्या मुळा धरणालगत असलेल्या खडकवाडी शिवारातील बर्डे वस्तीवर सोमवारी दुपारी झोपडीला आग लागल्याची घटना घडली.
काजल गोरख वर्पे या महिलेचे कुटूंब या झोपडीत वास्तव्यास होते.दुपारच्या वेळेत झोपडीला आग लागल्याने या कुटूंबाची पळापळ झाली.
आगीची तिव्रता मोठी असल्याने झोपडीतील धान्य,कपडे,भांडे आगीत जळून गेली. या घटनेची खबर मिळताच जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे,जालिंदर आडसुरे,रविंद्र शिंदे,
सचिन माळवदे,करण माळी यांनी घटनास्थळी धाव घेतली. गाडे यांनी डिग्रसचे तलाठी कदम यांच्याशी संपर्क साधून वर्पे कुटूंबाला मदत मिळण्यासाठी घटनास्थळाचा पंचनामा करण्याबाबत चर्चा केली.
मजुरी करून उपजिविका चालणाऱ्या कुटूंबाचा संसार आगीत खाक झाल्याने जिल्हा परिषद सदस्य गाडे यांनी या कुटूंबाला आर्थिक मदत दिली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम