Astro Tips : बुध ग्रह करणार मेष राशीत प्रवेश, या 3 राशींचे बदलणार भाग्य; जाणून घ्या अधिक

Ahmednagarlive24 office
Published:

Astro Tips : ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहणानंतर सगळ्यात वेगाने गोचर करणारा ग्रह म्हणजे बुध ग्रह आहे. ग्रहमंडळात बुध ग्रहाला राजकुमाराचा दर्जा प्राप्त असून सूर्याच्या जवळ असणारा हा ग्रह आहे. येत्या काही दिवसात बुध ग्रहाचा मेष राशीत प्रवेश होणार आहे. याचा फायदा काही राशींच्या लोकांना होणार आहे. दरम्यान या राशी कोणत्या आहेत? जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

या राशींवर होणार परिणाम

1. मिथुन

पहिली राशी मिथुन असून येत्या 10 मे रोजी बुध ग्रहाच्या उदयामुळे याचा मिथुन राशीला लाभ होणार आहे. जवळच्या मित्राकडून या राशीच्या लोकांना चांगली मदत मिळू शकते. तसेच तुमची दीर्घकाळ रखडलेली कामेही होऊ शकतात. वैवाहिक जीवनातही आनंद राहणार असून जे लोक अविवाहित आहेत, त्यांचे लग्न निश्चित होईल. तुमच्या काही योजना यशस्वी होतील.

2. सिंह

सिंह राशीचा उदय नवव्या घरात म्हणजेच भाग्यस्थानात होणार असल्याने या राशीच्या लोकांचे नशीब चमकणार आहे. या राशीचे लोक खूप खर्च करू शकतील, परंतु पैसेही येत राहतील. दरम्यान, या राशीचे लोक मित्रांसोबत धार्मिक सहलीला जाण्याची शक्यता आहे. त्यांना वडिलांच्या सल्ल्याने करणाऱ्या कामात यश मिळू शकेल. इतकेच नाही तर लेखन, कला, माध्यमांशी निगडित लोकांना नवीन संधी मिळू शकतील.

3. कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण तृतीय घरात असून याचाच परिणाम तर्कशक्ती तसेच वक्तृत्वावर दिसून येणार आहे. या राशीच्या लोकांना त्यांच्या वाणीमुळे यश मिळणार आहे. तर कुंभ राशीच्या लोकांशी वाद घालणे तसेच त्यांना तर्काने पराभूत करणे खूप अवघड होऊ शकते. तसेच या राशीच्या लोकांना गुंतवणुकीचा खूप फायदा होणार आहे. दरम्यान त्यांचे नशीब पूर्ण बदलून या राशीच्या लोकांना मान-सन्मान मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe