अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाचा पोलिसांनी योग्य तपास केला नाही. याप्रकणी पोलिस अधीक्षकांनी योग्य ती कार्यवाही करावी, असा आदेश जिल्हा न्यायालयाने दिला आहे.
सरकारी वकील अॅड. अर्जुन पवार यांनी न्यायालयात स्वतंत्र म्हणणे सादर केल्यानंतर न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

१६ फेब्रुवारी २०२० रोजी हा प्रकार घडला होता. घटनेच्या वेळी पिडित मुलगी १४ तर आरोपी साडेसतरा वष वयाचा होता. पोलिस उपनिरीक्षक अमरजित मोरे हे या गुन्ह्याचा तपास करत होते.
दरम्यान, १३ डिसेंबर २०२० रोजी आरोपीने पिडित मुलीला कर्जत येथे सोडून स्वत: फरार झाला. त्यानंतर पोलिसांनी पिडित मुलीच्या जबाबनुसार गुन्ह्यात ३७६ व पोक्सो अंतर्गत वाढव कलमे लावली.
आरोपीने पिडित मुलीला पळवून नेल्यानंतर तिच्यावर शिरूर येथे वारंवार अत्याचार केला. त्यातून ती गभवती राहिली. त्यानंतर आरोपीने साथीदाराच्या मदतीने पिडितेचे बनावट आधारकार्ड तयार करून
शिरूर येथील डॉ. संतोष चौरे यांच्या हॉस्पिटलमध्ये तिचा गभपात केला. त्यानंतर आरोपीने श्रीगोंदे येथील जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. मात्र, न्यायधीश एम. एस. शेख यांनी आरोपीचा जामिन फेटाळला.
त्याचबरोबर गुन्ह्याच्या संदर्भात योग्य कार्यवाही करण्याबाबत अॅड. अर्जुन पवार यांनी पोलिस अधीक्षकांना प्रत देण्याबाबतचे आदेश दिले. अॅड. पवार यांना अॅड. मंगेश दिवाने यांनी मार्गदशन केले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













