अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :- नगर येथील रुग्णालयात स्टाफ नर्स म्हणून खासगी नोकरी करणाऱ्या २६ वर्षीय तरुणीला देवळाली प्रवरा येथील फय्याज शेख याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अकरा महिने अत्याचार केल्याची घटना राहुरी व नगर पोलिस ठाणे हद्दीत घडली.
या प्रकरणी संबंधित तरुणीने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. संगमनेर तालुक्यातील रहिवासी असलेली ही तरुणी नगर येथील एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून नोकरी करत आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2021/02/rape-1.jpg)
१३ जून २०२० ते ७ मे २०२१ या दरम्यान आरोपी फय्याज शेख, रा. देवळाली प्रवरा याने राहुरी तालूक्यातील चिंचोली फाटा तसेच नगर येथील लॉजवर नेऊन इच्छेविरुद्ध अत्याचार केला.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या तरुणीने राहुरी पोलिसात फिर्याद दिली. तिच्या फिर्यादीवरून पोलिसांत फय्याज असलम शेख याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|