अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगरच्या नौगाममधील भाजपचे नेते अन्वर खान यांच्या घरावर गुरूवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला.
या घटनेत तेथे तैनात जवान शहीद झाला. अन्वर बारामुल्लाचे सरचिटणीस आहेत आणि कुपवाडाचे प्रभारी देखील आहेत.
काश्मीर रेंजचे आयजीपी विजय कुमार म्हणाले, लष्कर-ए-तोयबाच्या चार दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. दोघांची ओळख पटवण्यात आली आहे.
दोघेही श्रीनगर येथील रहिवासी आहेत. हल्ला करण्यासाठी एका दहशतवाद्याने बुरखा घालून अन्वर यांच्या घराचे दार ठोठावले आणि महिलेच्या आवाजात संभाषणही केले.
सुरक्षा रक्षकाने दार उघडताच इतर दहशतवादी घरात घुसले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्यात जवान शहीद झाला.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|