अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस जनतेच्या आरोग्यासाठी कर्तव्य बजावत असताना जमावाने जाऊन त्यांच्यावर हल्ला करणे ही घटना दुर्दैवी आहे.
कोणत्याही परिस्थितीत दोषींना शिक्षा झाली पाहिजे. पोलिस प्रशासनाने कायदेशीर करावी, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
गुरुवारी शहरातील दिल्ली नाका येथे बंदोबस्तासाठी तैनात असणाऱ्या पोलिसांवर हल्ला केला पोलिसांचा राहण्यासाठी असणारा तंबू तोडला.
या पार्श्वभूमीवर मंत्री थोरात यांनी आपली प्रतिक्रिया देताना कोणीही असो पोलिस प्रशासनेने गुन्हेगारांवर करावी.
आपल्या आरोग्यासाठी व आपल्या जीवनासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या पोलिसांवर हल्ला करण्याची बाब गंभीर व दुर्दैवी आहे, असे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|