अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- मौजे गोपाळपुर ता नेवासा येथील दलित दफन भूमीत मृत व्यक्तींच्या मृतदेहाची विटंबना व उत्खनन केल्याच्या निषेधार्थ वारंवार पत्र व्यवहार करून देखील अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्यामुळे श्रीधर रायभान शेरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी ताब्यात घेतले.
गावातील सर्व दलित व आदिवासी समाजातील लोक पारंपरिक पद्धतीने मृतदेहावर अंत्यसंस्कार करीत आहे दफनभूमी मध्ये गावातील दलित समाजातील लोकांचे पूर्वजांचे दफन करण्यात आलेले आहे सदर शेत्र मध्ये माझे वडील रायभान रावजी शेरे यांचे देखील दफन सदर क्षेत्रांमध्ये करण्यात आलेले होते व त्या ठिकाणी त्यांची आठवण म्हणून छोटे थडगे बांधलेले होते व त्या जागेवर जर वर्षी आम्ही पूजा करून त्यांना श्रद्धांजली वाहतो अशी परिस्थिती असताना
सदर दफन भूमी मध्ये गावातील ग्रामपंचायत चे पदाधिकारी सरपंच पद्मा विलास ढोकणे उपसरपंच सोपान राजाराम घुले व ग्रामपंचायतीचे ठेकेदार सरपंच यांचा पुतण्या किरण शेषराव ढोकणे यांनी संगनमताने सदर दफन भूमी मध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश करून जेसीबी मशिनच्या साह्याने सदर जागेमध्ये उत्खनन करून
बेकायदेशीर रित्या मुरूम काढला व सदरचा मुरूम हा गावातील रस्त्यांसाठी कोणत्याही प्रकारची रॉयल्टी शासनास न भरता स्वतःच्या फायद्यासाठी शासकीय मालमत्तेचा बेकायदेशीरपणे वापर केला सदर दफन भूमी मध्ये दलित समाजाच्या पूर्वजांचे दफन केलेले ठिकाण जेसीबी मशिनने व करून त्यातील त्यांचे हाडांचे सांगाडे बाहेर काढून ते आडे रस्त्यामध्ये टाकून त्यांच्यावर रस्ता तयार केला व दलित समाजाच्या मूर्त लोकांच्या देहाची विटंबना करून
भाडे गावाच्या रस्त्यात वापरून पायदळी तुडवली सदर ठिकाणी माझे वडिलांचे देखील थडगे वरील इसमांनी संगनमताने उकरून काढले सदर बेकायदेशीर उत्खननाबाबत ग्रामपंचायत गोपाळपूर यांना तसेच इतर शासकीय अधिकाऱ्यांना यापूर्वी लेखी निवेदन व तोंडी माहिती देऊनही सदर इसमांच्या विरोध अद्यापपर्यंत कोणतीही कायदेशीर कारवाई शासनाकडून झालेली नाही याउलट
सदर प्रकरण दाबण्यासाठी गावातील संबंधित राजकीय व्यक्ती या शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून आमच्यावर दबाव आणत आहेत सदर घटना ही अत्यंत निंदनीय व गंभीर स्वरूपाची असताना देखील त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. सदर घटनेबाबत आत्मदहन करण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना 1 जुलै रोजी दिले होते.
मौजे गोपाळपूर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांनी घाईघाईने त्यांच्या खात्याच्या वरिष्ठांचा कोणताही सल्ला न घेता स्वतःच्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करत अज्ञात इसम विरुद्ध उत्खनना बाबत तक्रार दाखल केली आहे वास्तविक पाहता दफनभूमीची देखरेख व देखभाल करण्याचे सर्वस्वी जबाबदारी ही ग्रामपंचायतीचे अधिकारी व पदाधिकारी यांची एकत्रित असतानादेखील संबंधित व्यक्तींनी याची देखभाल न करता
उलट दलितांवर झालेला अन्याय दडपून टाकण्यासाठी ग्रामसेवकांनी स्वतःचा अधिकार कक्षेच्या बाहेर जात पदाधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी खोट्या स्वरूपाची तक्रार दाखल करून शासनाची व दलित समाजाची फसवणूक केलेली आहे अशाप्रकारे दलित समाजाच्या भावना दुखावल्या आहेत अशा परिस्थितीत वरील घटनेची चौकशी होऊन संबंधित सर्व व्यक्ती विरुद्ध दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करण्याची मागणी श्रीधर रायभान शेरे यांनी केलेली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम