तलवारीचा धाक दाखवून हॉटेल बळकावण्याचा प्रयत्न

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :-तलवारीचा धाक दाखवून हॉटेल बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांच्या विरोधात शिर्डी गुन्हा दाखल झाला आहे.बुधवार दि.१४ एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजता ही घटना घडली.

याबाबत हॉटेल मालक बापूसाहेब बापूराव गायके यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, राहाता तालुक्यातील शिर्डी लगत असलेल्या रुई शिवारात असलेल्या

माझ्या मालकीचे असलेले हॉटेल साईतेज हे अविनाश अशोक शिंदे याला सहा हजार रुपये महिन्याने चालवण्यास दिले होते.

त्याच्याकडे ४२हजार रुपये भाडे बाकी आहे.मात्र मागणी करूनही पैसे देण्यास टाळाटाळ करुन हॉटेल खाली न करता शिंदे व त्याच्या पाच मित्रांनी एकत्र येऊन मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देऊन माझ्या कडून बोगस नोटरी करून सह्या घेतल्या होत्या.

तसेच नोटरी फाडून टाकू ,असे सांगितले. पण तसे केले नाही.चार हजार पाचशे रुपये व एटीएम काढून घेतले.त्यांना विरोध केला असता

तलवार मानेला लावून जीवे मारण्याची धमकी देऊन माझे हॉटेल बळकावण्याचा प्रयत्न केला. सदरची घटना १४ एप्रिल रोजी घडली,अशी फिर्याद बापूसाहेब बापूराव गायके ४० व्यवसाय नोकरी राहणार पिंपळवाडी रोड शिर्डी

यांनी फिर्याद दिल्याने शिर्डी पोलिसांनी सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती अधिकारी संजय सातव यांनी दिली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe