अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- नगर तालुक्यातील जेऊर येथील सचिन बाळासाहेब वाघमारे यास दोघांकडून बेदम मारहाण करण्यात आली.
एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनला सचिन वाघमारे याचा भाऊ सुनील वाघमारे याने दिलेल्या फिर्यादीवरून सचिन विष्णू ससे (रा. ससेवाडी ता. नगर) व आदिनाथ म्हस्के (रा. चाफेवाडी) यांच्या विरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवार दि.५ रोजी आरोपी यांनी राहत्या घरी येऊन काही एक कारण नसताना जातिवाचक शिवीगाळ करून आदिनाथ म्हस्के याने लोखंडी गजाने डोक्यात मारले तर सचिन ससे याने दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्याद पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे.
आरोपी सचिन ससेला अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे. अधिक तपास एम.आय.डी.सी. पोलिस करत आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|