अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :- एकीकडे जिल्ह्यात कोरोनाचे संकट सुरूच आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात गुन्हेगारीने डोकेवर काढले आहे.
यातच किरकोळ कारणातून जीवघेणा हल्ला करण्याच्या घटना जिल्ह्यात घडू लागल्या आहेत. नुकतेच एका तरूणाला जातीवाचक शिवीगाळ करत
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2020/09/मारामारी.jpg)
डोक्यात गज घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. सचिन बाळासाहेब वाघमारे (वय 32 रा. जेऊर बायजाबाई ता. नगर) असे जखमी तरूणाचे नाव आहे.
नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई गावामध्ये ही घटना घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|