उद्दिष्टपूर्तीसाठी वाहनांची लिलाव हा एक मुख्य मार्ग

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:-अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांना दंड केल्यानंतर दंडाची रक्कम भरण्यास असमर्थता दर्शविणाऱ्या वाहनांचा लिलाव करण्यात आला. दरम्यान या लिलावातून प्रशासनाला तब्बल ४० लाखांचा महसूल जमा झाला आहे.

लिलाव प्रक्रिया प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार उमेश पाटील, नायब तहसीलदार अभिजीत बारवकर, गायके, महसूल सहायक इंगळ, महसूल सहायक गायकवाड, लहारे, कोतवाल आकाश करपे, देवेंद्र परदेशी यांच्या उपस्थितीत पार पडली.

लिलावासाठी एकूण २८ वाहनांसाठी प्रक्रिया राबविण्यात आली होती. वाहनांचा लिलाव नगर तालुका तहसील कार्यालयाच्या आवारात करण्यात आला. सहा वाहन चालकांनी पंधरा लाख वीस हजार रुपये एका दिवसातच तहसील कार्यालयात जमा केले. उर्वरित २२ वाहनांचा लिलाव करण्यात आला.

ज्यातून एकूण २४ लाखांचा महसूल जमा झाला. नगर तहसील कार्यालयास एकूण ३३ कोटी सहा लाख रुपयाचे वसुलीचे उद्दिष्ट दिले. या उद्दिष्टपूर्तीसाठी वाहनांची लिलाव हा एक मुख्य मार्ग म्हणून पुढे येत आहे. यामुळे अवैध वाहतूक करणाऱ्यांवरही वचक बसणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe