Suzuki Burgman Street 125:- बाजारामध्ये अनेक प्रकारच्या टू व्हीलर्स म्हणजे दुचाकी सध्या उपलब्ध आहेत. तसेच स्कूटरचा विचार केला तर होंडा एक्टिवा तसेच एक्सेस यासारख्या बाजारपेठेत चांगली मागणी व ग्राहकांच्या पसंतीच्या स्कूटरचा आपल्याला उल्लेख करता येईल.
जर 125cc स्कूटरचा विचार केला तर यामध्ये देखील बरेच कंपन्यांचे वेगवेगळे मॉडेल्स उपलब्ध असून या प्रकारच्या स्कूटरला ग्राहकांकडून देखील मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. यामधील काही स्कूटर या जास्त मायलेज असणाऱ्या स्कूटर असून परवडणाऱ्या किमतीमध्ये ते ग्राहकांना घेता येतात.
याच श्रेणीतील जर आपण सुझुकीची बर्गमॅन स्ट्रीट 125 या हायलँड स्कूटरचा विचार केला तर ही देखील एक अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आणि परवडणाऱ्या किमतीमध्ये व उत्तम मायलेज देणारी स्कूटर आहे. याच अनुषंगाने या लेखांमध्ये आपण सुझुकी बर्गमॅन स्ट्रीट 125 या स्कूटरविषयी महत्त्वाची माहिती बघणार आहोत.
सुझुकी बर्गमॅन स्ट्रीट 125 स्कूटरची वैशिष्ट्ये
1- वैशिष्ट्यपूर्ण हेडलाईट- या स्कूटरला एप्रोन माउंटेन हेडलाईट देण्यात आलेले असून यामुळे या स्कूटरचा लूक खूप आकर्षक दिसतो. ही स्कूटर रस्त्यावर 8.58 bhp चा उच्च पावर प्रदान करते तसेच ही स्कूटर एकत्रित ब्रेकिंग सिस्टम सह सुसज्ज अशी बनवण्यात आलेली आहे. रस्त्यावर धावतानाही रायडरला अतिरिक्त सुरक्षितता प्रदान करण्याचे काम करते. यामध्ये असलेली सेन्सरवर चालणारी प्रणाली दोन्ही टायर नियंत्रित करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर मदत करते.
2- पावरफुल इंजिन- बर्गमॅन स्ट्रीट 125 या स्कूटरमध्ये 124cc उच्च कार्यक्षमतेचे इंजिन देण्यात आले असून ते 780Nm चा पिक टॉर्क जनरेट करते. यासोबतच या स्कूटरला स्टायलिश असे अलोय व्हील्स देण्यात आलेले आहेत व याचा फ्रंट लूक खूप आकर्षक बनवण्यात आला आहे. बर्गमन स्ट्रीट 125 ही हाय स्पीड स्कूटर आहे. या स्कूटरची प्रामुख्याने स्पर्धा ही यामाहा फॅसिनो 125 सोबत आहे.
3- कम्फर्टेबल सीट डिझाईन- या स्कूटरमध्ये रुंद असे फुटबोर्ड आणि आरामदायी असे सिंगल सीट देण्यात आलेले आहे. सीटची रचना ही थोडी रुंद आणि कम्फर्टेबल म्हणजेच खूपच आरामदायी आहे. ही स्कूटर तब्बल तेरा रंगांमध्ये उपलब्ध असून तीन प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये ती उपलब्ध आहे. या स्कूटर च्या पुढच्या चाकावर डिस्क ब्रेक आणि मागच्या टायरवर ड्रम ब्रेक देण्यात आला आहे.
4- स्पीडोमीटर आणि हँडलबार- या स्कूटर च्या एक्झॉस्टवर हिटशील्ड संरक्षण देण्यात आलेले आहे. 110 किलो वजन असलेल्या या स्कूटरमध्ये स्पीडोमीटर तसेच हँडल बार, एप्रोन इंटिग्रेटेड फ्रंट टर्न इंडिकेटर देण्यात आलेले आहेत.
5- सुझुकी बर्गमॅन स्ट्रीट 125 स्कूटरची किंमत- या स्कूटरची एक्स शोरूम किंमत पाहिली तर ती 95 हजार 802 रुपये अशा सुरुवातीच्या किमतीत दिली जात आहे.