अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- ई – निविदा बी- १ निविदा प्रक्रियेत कार्यारंभआदेश देताना जावक नंबर दिनांक तसेच सरपंच सही नसणे या बाबत संबधित ग्रामसेवकांवर कारवाई न केल्याने पंचायत समिती राहुरी कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी यांना निवेदना द्वारे देण्यात आला आहे.
निवेदनात म्हंटले आहे की,ई – निविदा आणि बी-१ निविदा प्रकिया राबवताना राहुरी तालुक्यात अनेक गावांत मनमानी पद्धतीने अटी शर्ती लादून निविदा मानवी हस्तक्षेपामुळे सदोष असल्या बाबत आपल्याकडे दि ४सप्टेंबर २०२० रोजी निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी पुराव्यासह करण्यात आली होती.तरी देखील आपण स्वतः यात ग्रामसेवका इतकेच जबाबदार आहात म्हणून की काय आज पर्यंत माहिती अधिकारात माहिती घेऊन आपल्याकडे लेखी तक्रार देऊन देखील कारवाईस टाळाटाळ होताना दिसत आहे.
म्हणून पुन्हा निवेदन पुराव्यानिशी देऊन कारवाईची मागणी करतआहोत; त्यात ग्रामपंचयत कणगर निविदा क्र. २०१९AHMED ४६७१-१ याची दि २४/१०/१९ चा कार्यरंब आदेश वर सरपंच यांची सही नाही. ‘निविदा क्र.२०१९-AHMED-५०१९७४-१दि२६/१२/१९ चा कार्यरंब आदेशावर जावक क्रमांक नाही, दि २२/१/१९ – ला जावक नंबर नाही,तसेच तिन्ही मध्ये मुद्रांक दिनांक नाही. ग्रामपंचयत मनोरी निविदा क्र २०१९ AHMED ४५११२०७१ दि. २३/७/१९ च्या कार्यआरंभ आदेशात जावक नंबर नाही.
निविदा क्रमांक २०१८ एच एम ए डी ३६ ३७ ०७ २ दिनांक ३१/१/१९ कार्यारंभ आदेश जावक नंबर नाही.मुद्रांक करारनामा यावर दिनांक नाही. निविदा क्रमांक २०१९ AHMED ४५ १२ ०९१ दिनांक २२/७/१९ चा नंबर नाही. ग्रामपंचयत मोमीन आखाडा दि ३०/७/२०१९ बंदिस्त गटार बी १ निविदा कार्यआरंभ आदेशावर जावक नंबर नाही.करारनामा मुद्रांकचा दिनांक नाही.आदेश रजिष्टर पोष्टाने पाठविला आहे,तसेच दि ९/११/१९ कार्यारंभ आदेश जावक क्रमांक नाही.ग्रामपंचायत तांभेरे निविदा क्र १९ एच एम ए डी ४४ ९७ ३८ १ दिनांक २३/७/१९ कार्यारंभ आदेश जावक क्रमांक नाही.
मुद्रांक करारनामा वर दिनांक नाही. दलित वस्ती चे काम गटविकास अधिकाऱ्याच्या सहीने आदेश आहे.ग्रामपंचायत कोंढवड दि.१४ ची निविदा जावक क्रमांक नाही. राहुरी खुर्द ग्रामपंचायत कार्यारंभ आदेशात दिनांक नाही, जावक नंबर नाही.सिमेंट कॉंक्रीट रस्ता गोटुंबे आखाडा तांत्रिक मंजुरी आदेश ०३-०७-२०१७ तसेच निविदा क्रमांक २०१९ AHMED ४० ३९ ५६ १ जावक क्रमांक १०/ १९ कार्यारंभ आदेश ला दिनांक नाही.
तसेच दिनांक २५/३/१८-ग्रामपंचायत कार्यालय फर्निचर साहित्य पुरवणे जावक नंबर नाही.ग्रामपंचायत ब्राह्मणी निविदा क्रमांक २०१९ AHMED ४२ ७१ ६०-१ दिनांक ९/३/१९ कार्यारंभ आदेश जावक नंबर नाही. ग्रामपंचायत तांदुळनेर निविदा क्रमांक २०१९ AHMED ५१ ८० ७०-१ कार्यारंभ आदेश जावक क्रमांक नाही,दिनांक नाही,करारनामा मुद्रांक दिनांक नाही,स्मशान भूमी विकास काम.ग्रामपंचायत आरडगाव निविदा क्रमांक २०१९ AHMED ४८ ९२ २१_१ दिनांक १६/९/१९ दिनांक खाडाखोड जावक नंबर नाही.
ग्रामपंचायत चेडगाव निविदा क्रमांक २०१९ AHMED ५१ ६३ ९८-१ गटविकास अधिकाऱ्यांच्या सहीचे कार्यारंभ आदेश जावक नंबर नाही, दिनांक नाही,अटी व शर्ती करारनामा मुद्रांक दिनांक नाही.या ग्रामपंचायतीच्या २०१९ च्या कोणत्याही कार्यारंभ आदेशावर जावक नंबर नाही. ग्रामपंचायत खडांबे खुर्द निविदा क्रमांक २०१९ अहमद ४० ४६ ८२-१, दि.२६/२/१९ चा कार्यारंभ आदेश जावक क्रमांक नाही. ग्रामपंचायत पिंपळगाव फुणगी निविदा क्रमांक २०१९ अहमद ५१ ७४ ०५१ दि. २७/१२/१९ कार्यारंभ आदेश जावक नंबर नाही.
दि.१/८/१९ प्राथमिक शाळा गावठाण समोर ब्लॉक बसवणे जावक क्रमांक नाही.१८/१९जाधव वस्ती पाणीपुरवठा पाईप लाईन अंगणवाडी कार्यारंभ आदेश जावक नंबर नाही.दि २१/५/१८ पीव्हीसी पाईप गटर कार्यारंभ आदेश जावक नंबर नाही.अटी शर्ती करारनामा मुद्रांक दि. नाही. निविदा क्र.२०१९ अहमद ५१ ८८ २३-२ दि. २४/४/२० जावक नंबर नाही.निविदा क्रमांक २०२० अहमद ५२ ७५ ८७१ दिनांक १४/२/२० नंबर नाही.
ग्रामपंचायत ब्राह्मणी निविदा क्रमांक २०१९ ते अहमद ५० ८१ ७५१ दि.२६/१२/१९ कार्यारंभ आदेश जावक नंबर नाही.निविदा क्रमांक २०२० अहमद ५३ ८९ ७८२ दि २०/२/२० रोजी चा कार्यारंभ आदेश जावक क्रमांक नाही. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत बारागावनांदूर, ग्रामपंचायत डिग्रस, ग्रामपंचायत करजगाव, ग्रामपंचायत मालुन्जा खुर्द, ग्रामपंचायत उंबरे, ग्रामपंचायत तांदुळवाडी इत्यादी ठिकाणी देखील कार्यारंभ आदेश देताना नंबर नसणे,अटी शर्ती करारनामा मुद्रांक दिनांक नसणे,ग्रामपंचायत वांबोरी येथे ऑनलाइन निविदा अंदाज पत्रक मिळालाच काढणे.
अशा अनेक ग्रामपंचायतीच्या माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार पुराव्यांनिशी आपणाकडे सादर केलेले आहे.संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक त्यांची दप्तर तपासणी करणारे विस्ताराधिकारी या सर्वांची चौकशी करून तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी अन्यथा आपल्या कार्यालयात दिनांक ३०जुलै २१ रोजी टाळे ठोकण्याची आंदोलन अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
होणाऱ्या आंदोलनाची जबादारी संबधित गटविकास अधिकारी यांची असेल याची नोंद घ्यावी असे निवेदनात म्हंटले आहे. निवेदनावर जिल्हा प्रमुख नितीन पटारे,जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र लांबे, तालुका प्रमुख रमेश म्हसे, अमोल वाळुंज, कृष्णा गागरे आदींच्या सह्या आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम