अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :- कर्जत शहरासह तालुक्यातील १२ दुकाने प्रशासनाने सील केली आहेत. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रशासनाने हि आक्रमक कारवाई केली आहे. या आक्रमक कारवाईमुळे दुकानदार चांगलेच धास्तावले आहे. यामुळे कारवाई नको असले तर नियमांचे पालन आवश्यकच आहे.
या दुकानावर प्रशासनाचा कारवाईचा बडगा मिरजगाव येथील सुविधा बेकर्स, जाधव किराणा, माहीजळगाव येथील हॉटेल साई सेवा, पांडुरंग बेकर्स, राशीन येथील आशीर्वाद कापड दुकान, प्रिया जनरल स्टोअर्स, संतोष केशभूषा, दत्त कुशन, दीपक मेन्स पार्लर, कर्जत येथील जगदंबा कलेक्शन, हॉटेल फिरोज, निलायम मेन्स वेअर या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.
उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत, मिरजगाव, राशीन, माहीजळगाव येथे महसूलच्या पथकाने कोरोना नियमांचे पालन न करणारी वेगवेगळी दुकाने, मंगल कार्यालये यांच्यावर कारवाई केली. या भरारी पथकांनी सायंकाळी चारनंतर राशीन, मिरजगाव, माहीजळगाव, कर्जत शहर येथे अचानक भेटी दिल्या.
एकूण बारा आस्थापना या चारनंतरही सुरू असल्याचे निदर्शनास आले. या आस्थापना पुढील सात दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सकाळी सात ते चार असा आस्थापना सुरू ठेवण्याचा कालावधी आहे.
कोरोनाबाबतच्या निर्बंधांचे पालन न करणाऱ्या तसेच सायंकाळी चारनंतरही आस्थापना सुरू ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाला आदेश देण्यात आले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम