दुबार पेरणीचे संकट टळल्याने बळीराजा चिंतामुक्त

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 जुलै 2021 :- जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने जिल्ह्यातील दुबार पेरणी च संकट टळल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या अनेक शेतकर्‍यांनी पेरण्या केल्या होत्या.

मात्र पावसाचा अंदज चुकल्याने या पेरण्यांवर दुबार पेरणीचे संकट आले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे दुबार पेरणीचे संकट टळल्याने तालुक्यातील शेतकरी सुखावला आहे.

नगर तालुक्यात अपेक्षित क्षेत्राच्या ८५ टक्के पेरणी झाली आहे. पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. मात्र, पावसाने उसंत घेऊन मागील ३-४ दिवसांत तो पुन्हा परतल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

खरीप पेरणीला त्यामुळे जीवनदान मिळाले आहे, नगर जिल्ह्यात मागील आठवड्यात चांगला पाऊस झाला. त्याचा लाभ पिकांना होणार आहे. त्यामुळे खरिपातील पिके चांगली येणार आहेत. जिल्ह्यात सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने सोयाबीन, बाजरी, मूग, तूर, कापूस अशा खरिपातील पिकांची पेरणी झाली.

मात्र पेरणीनंतर पाऊस लांबल्याने चिंता होती. आता पाऊस आल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. पूर्वीच्या तुलनेत मागील २ वर्षांपासून मान्सूनपूर्व व मान्सूनच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने खरीप पेरणीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

आता पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाअभावी ज्यांची पेरणी राहिली असेल, त्यांना आता सोयाबीन व तूूर पेरणीची संधी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe