अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- कोरोनामुळे शेकडो वर्षांपासून अखंडित सुरू असलेली वारीची परंपरा सलग दुसऱ्या वर्षी देखील खंडित होण्याचा धोका निर्माण झालेला आहे.
मागील वेळा झाले ते झाले मात्र या वर्षी वारीची परंपरा खंडित होता कामा नये. यासाठी प्रतिकात्मक स्वरूपात का होईना पण पायी वारी सोहळ्याला परवानगी द्या. आम्ही कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करू असे आश्वासन पालखी सोहळाप्रमुखांनी राज्य सरकारला दिले आहेत.
त्याचसोबत अनेक वारकरी ‘बा …विठ्ठला यंदा तरी भेट घडू दे रे’! असे साकडे घालत आहेत. पायी वारीत सहभागी होण्यासाठी विविध दहा संस्थानांनी सरकारपुढे तीन पर्याय ठेवले आहेत.
यात जर कोरोना नियंत्रणात आला तर पाचशे, मध्यम दोनशे आणि सद्यस्थिती कायम राहिली तर शंभर वारकऱ्यांना घेऊन पायी वारीची परवानगी द्यावी.
अशी मागणी केली आहे. शेकडो वर्षांची वारीची परंपरा ही कोरोनाची दुसरी लाट आणि संभाव्य तिसरी लाट यांच्यादरम्यान आहे.
त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर, ग्रामीण व्यवस्थेवर ताण येऊ न देता हा सोहळा पार पाडवा लागणार आहे. यासाठी गेल्या महिनाभरापासून पालखी सोहळाप्रमुख आणि संस्थाने प्रयत्न करत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम