अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- 16 वर्षांची मुलगी आणि 17 वर्षांचा मुलगा यांच्या प्रेमप्रकरणातून जन्माला आलेल्या बाळाला कुमारी मातेने विहिरीच्या पाण्यात फेकले.
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेड तालुका अंतर्गत येणाऱ्या वाकडी गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आसपासच्या परिसरात खेळणाऱ्या मुलांना विहिरीत काहीतरी तरंगताना आढळले.
ग्रामस्थांनी ती वस्तू बाहेर काढल्यानेतर तो नवजात बाळाचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाल्याने कुमारी मातेचे बिंग फुटले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला बेड्या ठोकल्या आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात वाकडी गावात हा प्रकार घडला. एका कुमारी मातेने प्रेमप्रकरणात जन्मलेल्या नवजात अर्भकाला शासकीय विहिरीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. वाकडी गावातील काही मुलं सार्वजनिक विहिरीच्या आवारात खेळत होती.
यावेळी मुलाना विहिरीच्या पाण्यात काहीतरी तरंगताना दिसलं. गावकऱ्यांनी पोलीस स्टेशन, कुरखेडाला माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.
त्यावेळी नवजात बालक मृतावस्थेत आढळले. बाळाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढल्यानंतर तपास सुरु करण्यात आला. गावातल्या एका कुमारी मातेने त्या नवजात मुलाला प्रेम प्रकरणातून जन्म दिला होता, त्यानंतर त्याला विहिरीत फेकून दिल्याची माहिती पोलिसांसमोर आली. आरोपी कुमारी मातेला पोलिसांनी अटक केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम