अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:- बहूचर्चित रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सुत्रधार बाळ बोठे यास मदत करणारे हैदराबाद येथील चारजण तसेच नगर येथून मदत करणाऱ्या महेश तनपुरे यांचा जामीन अर्ज पारनेर न्यायालयाने मंजूर केला आहे. रेखा जरी हत्या प्रकरणात आरोपी बोठे यास मदत करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
अटक केल्यानंतर त्यांना पारनेर न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते. आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती तो कालावधी पूर्ण झाल्यानंतर दि१६ रोजी आरोपींना पुन्हा कोर्टात हजर केले, त्यापैकी हैदराबाद येथील वकील जनार्दन अंकुला, इस्माईल शेख ,राजशेखर चाकली,अब्दुल रहमान तसेच नगर मधून बोठे यास मदत करणारा महेश तनपुरे याचा जामीन अर्ज पारनेर न्यायालयाने मान्य केला आहे.
यावेळी आरोपींच्या वतीने अॅड.संकेत ठाणगे यांनी युक्तिवाद केला.या युक्तिवादात अॅड.ठाणगे यांनी सदर पाचही आरोपींची गुन्हे हे जामिनपात्र असल्याने त्यांना जामीन करण्याची मागणी केली.
तर सरकारी वकील म्हणुन मनिषा दुबे यांनी काम पाहीले दरम्यान महेश तनपुरे वगळून बाकी चारही आरोपींना जामीन मंजूर होऊनही जामीनदार न मिळाल्याने त्यांना न्यायालयीन कोठडीतच थांबावे लागणार आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
- #Former Union Minister Dilip Gandhi dies