त्रिदल सैनिक संघटनेचे अध्यक्ष लगड यांना जामीन

Published on -

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :- त्रिदल सैनिक संघटनेचे अध्यक्ष संदीप वामन लगड यांना विनयभंगाच्या गुन्ह्यात नुकताच जिल्हा न्यायालयाने जामीन दिला असल्याची माहिती सैनिक समाज पार्टीचे कार्यकारणी अध्यक्ष अ‍ॅड. शिवाजी डमाळे यांनी दिली.

त्रिदल सैनिक संघटना ही माजी सैनिक, वीर पत्नी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी न्याय, हक्कासाठी कार्यरत आहे. संघटनेचे अध्यक्ष असलेले संदीप लगड यांच्या विरुद्ध कोतवाली पोलिस स्टेशनला कलम 354 अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता.

एस.के. आठरे, संदीप पाटोळे, अशोक चौधर, सर्जेराव काळे, खेंडकर आदी माजी सैनिकांनी त्रिदल सैनिक संघटनेच्या माध्यमातून जिल्हा सैनिक कार्यालयावर कायदेशीर मार्गाने आंदोलन केले होते.

त्यावेळी त्रिदल सैनिक संघटनेच्या पदाधिकार्‍यांवर दबाव आणण्यासाठी एका महिलेला पुढे करून सदरची केस दाखल करण्यात आली असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

संदीप लगड यांना पोलिसांनी इतर आंदोलनाच्या गुन्ह्यात दौंड येथील कारागृहात असताना वॉरट घेऊन जिल्हा न्यायालयात हजर केले.

न्यायालयाने संदीप लगड यांची बाजू ऐकून घेऊन, त्यांना 15 हजार रुपयाचा जामीन मंजूर केला. लगड तर्फे सैनिक समाज पार्टीचे कार्यकारिणी अध्यक्ष ऍड. शिवाजी डमाळे व ऍड. बी.जी. गायकवाड यांनी काम पाहिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News