मोक्का खटल्यात दोन आरोपींचा जामीन अर्ज मंजूर

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- अहमदनगर येथील सोलापूर महामार्गावरील छावणी परिषदेच्या टोल नाक्यावर दि.20/11/2020 रोजी सशस्त्र दरोडा पडला होता.

सदर गुन्ह्यातील आरोपींवर पोलिसांनी मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई केलेली होती. सदर गाजलेल्या मोक्का खटल्यामध्ये विशेष न्यायालयाने आरोपी प्रकाश भिंगारदिवे व संदिप वाघचौरे यांचा जामीर अर्ज मंजुर केला.

सदर दोषारोपपत्र वेळेत दाखल न केल्याने विशेष न्यायालयाने सदर आरोपींचा जामीन अर्ज मंजुर केला. तसेच या आधी याच खटल्यातील मुख्य आरोपी संदिप उर्फ म्हम्या शिंदे यांचाही जामीर अर्ज विशेष न्यायालयाने मंजूर केलेला आहे. या तीनही आरोपींची बाजू अ‍ॅड.परिमल कि.फळे यांनी मांडली.

अ‍ॅड. परिमल फळे यांनी केलेला युक्तीवाद विशेष न्यायालयाने ग्राह्य धरुन सदर आरोपींची रु. पन्नास हजार च्या जातमुचलक्यावर जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले. अ‍ॅड.फळे यांना अ‍ॅड.सागर गायकवाड, अ‍ॅड.अभिनव पालवे व प्राजक्ता आचार्य यांनी साह्य केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News