New Electric Scooter : जर तुम्ही नवीन इलेक्ट्रिक स्कुटर घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता बाजारात नवीन बजाज चेतक ई-स्कूटर लाँच झाली आहे. कंपनीची ही नवीन स्कुटर बाजारात आधीपासून असल्येल्या ओलाला कडवी टक्कर देईल.
सिंगल चार्जमध्ये स्कुटर 108KM धावेल. कंपनीने यात नवीन लुक आणि फीचर्स दिले आहे. कंपनीच्या या नवीन स्कुटरची किंमत 1.52 लाख रुपये इतकी असणार आहे. जाणून घेऊयात बजाज चेतक या स्कुटरचे फीचर्स आणि इतर माहिती सविस्तरपणे..

लुक आणि फीचर्स
हे लक्षात घ्या की नवीन बजाज चेतकच्या डिझाईनमध्ये कोणताच बदल कंपनीने केला नाही. त्याशिवाय कंपनीने हे मॉडेल आता तीन नवीन रंगात आणले आहे. यात मोठ्या रंगाचा LCD डिजिटल कन्सोल मिळत असून जो सध्याच्या आवृत्तीपेक्षा चांगला आहे.
ई-स्कूटरला प्रीमियम टू-टोन सीट, बॉडी-कलर रीअर व्ह्यू मिरर, सॅटिन ब्लॅक ग्रॅब रेल आणि मॅचिंग पिलियन फूटरेस्ट कास्टिंग मिळत आहे. याशिवाय, या नवीन स्कुटरमध्ये हेडलॅम्प केसिंग, इंडिकेटर आणि सेंट्रल ट्रिम एलिमेंट्स आता चारकोल ब्लॅकमध्ये आहेत, ज्यामुळे मॉडेलला एक फ्रेश लुक मिळत आहे.
किती किमी धावणार?
कंपनीची आगामी इलेक्ट्रिक स्कूटर आता एका चार्जवर 90 किमी ऐवजी 108 किमी (ARAI) धावू शकणार आहे. मात्र, कंपनीचे असेही मत आहे की, प्रत्यक्ष रेंज आता एका चार्जवर 90 किमी आहे. या स्कुटरच्या बॅटरीचा आकार फक्त 2.88 kWh ठेवला आहे. त्याची इलेक्ट्रिक मोटर 5.3 bhp आणि 20 Nm पीक टॉर्क निर्माण करते.
होणार फक्त 4 तासात चार्ज
सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही स्कुटर पूर्णपणे मेटल बॉडी असणार आहे. तसेच ऑनबोर्ड चार्जर मिळेल, जो सुमारे चार तासांत बॅटरी पूर्णपणे चार्ज करू शकणार आहे. इलेक्ट्रिक स्कूटर फास्ट चार्जिंग पर्यायासह येत नाही. स्कूटरसाठी बुकिंग आता सुरू होणार असले तरी वितरण एप्रिलपासून सुरू होईल. कंपनीने म्हटले आहे की त्यांनी मुख्य विक्रेत्यांसह पुरवठा साखळी मॉडेलची पुनर्रचना केली जाणार आहे. यामुळे कंपनीला प्रत्येक महिन्याला 10,000 पेक्षा जास्त इलेक्ट्रिक स्कूटर्सचे उत्पादन करता येईल.













